डॉक्टरांकडे जाण्यासाठी अनेक जण का घाबरतात?

1.

डॉक्टरांकडे जाण्यासाठी अनेक जण का घाबरतात?

2.

काही लोक फक्त हलगर्जीपणा करून आपला आजार वाढवून घेतात. त्यांच्या शरीरात काहीतरी चुकीचे होत आहे, हे कळल्यानंतरही ते लोक डॉक्टराकडे जात नाही.

3.

लवकर डॉक्टरांकडे जाण्याचे फायदे माहित नसल्यामुळे काही लोक आजार वाढवतात. आजाराची सुरूवात होताच डॉक्टरांकडे गेल्यावर तो लवकर संपतो.

4.

डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला काहीतरी होऊन जाईल, रिपोर्टमध्ये भलतेच काहीतरी निघून जाईल, या भीतीमुळेही लोक डॉक्टरांकडे जात नाहीत.

5.

भारत हा गरिबांचा देश आहे, हे एक कडवे सत्य आहे. आजही गरिब लोक मोठा आजार झाल्यास फक्त पैसे नसल्यामुळे दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे तो रोग वाढत जातो.

6.

ताप आल्यावर अनेकदा डॉक्टर इंजेक्शन देतात. पण, इंजेक्शनच्या भीतीमुळेही काही लोक मेडिकलच्या गोळ्या आणून खातात. पण डॉक्टरांकडे जात नाही.

7.

मानसिक आजारांची जाण आजही लोकांमध्ये नाही. जगातील प्रत्येक चौथा व्यक्ती कधी ना कधी मानसिक आजारांनी ग्रस्त झाल्याचे WHO ने म्हटले आहे. तरीही लोकांना हे सर्व नाॅर्मल वाटते.

8.

आपल्याला आजार झाल्याचे इतरांना कळल्यावर बदनामी होईल, यामुळेही लोक डॉक्टरांकडे जात नाहीत.

9.

काही घरांमध्ये मानसिक आधार देणारा कोणीच नसतो. त्यामुळेही डॉक्टरांकडे जाण्याची भीती वाटू शकते.

10.

काही घरांमध्ये मानसिक आधार देणारा कोणीच नसतो. त्यामुळेही डॉक्टरांकडे जाण्याची भीती वाटू शकते.