तणावामध्ये असताना खा हे नैसर्गिक पदार्थ

1.

तणावामध्ये असताना खा हे नैसर्गिक पदार्थ

2.

ताणतणाव कमी करण्यासाठी आरोग्यदायी अन्न खाणे महत्वाचे आहे, म्हणूनचं जेव्हा तुमच्यावर तणाव आल्यासारखे वाटेल तेव्हा आरोग्यदायी अन्नपदार्थ खात जा.

3.

मिक्स ड्रिंकमुळे आपल्या शरीरात ऊर्जा तयार होते व त्यामुळे आपल्याला कोणतेही काम करण्यास उत्साह येतो.

4.

डार्क चॉकलेटमध्ये पॉलीफेनॉल असतात. सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी हे महत्वाचेघटक ठरतात ज्यामुळे डोके शांत राहण्यास मदत होते

5.

पीनट बटर खाल्ल्याने स्मृती चांगली राहते व ताण कमी होण्यास मदत होते. हे सर्व शेंगदाण्यामध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमुळे होते.

6.

माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात. मासे खाल्ल्याने तुमचा मूड चांगला होतो आणि डिप्रेशन, डिसऑर्डरचा धोका कमी होतो.

7.

टोमॅटोच्या सालीमध्ये लाइकोपीन असते यामुळे शरीरात जे केमिकल्स तयार होतात त्यांना टाळण्यास मदत होते व नैराश्य आणि चिंता कमी होते.

8.

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत ज्यामुळे शरीराचा तणाव कमी होऊन तुम्हाला शांत आणि आनंदी राहण्यास मदत होते.

9.

आंबवलेले पदार्थ शरीरावरचा ताण कमी करून, चिंता कमी करण्यास मदत करतात.

10.

शरीरात व्हिटॅमिन बी 6 आवश्यक असते आणि केळीमध्ये हे भरपूर प्रमाणात असते. यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते