या घरगुती उपायांनी डोकेदुखीपासून आराम मिळवा

1.

या घरगुती उपायांनी डोकेदुखीपासून आराम मिळवा

2.

डोकेदुखीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. डोकेदुखीची ही कारणे जाणून घेऊन घरगुती उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होईल.

3.

उन्हामुळे जर डोकं दुखत असेल तर चंदन पावडरची पेस्ट तयार करून कपाळावर लावा.

4.

डोकेदुखीचा त्रास नेहमीचाच असलं तर सफरचंदावर मीठ लावून खात जा व त्यांनतर कोमट पाण्याचे सेवन करा. हा प्रयोग 8 ते 10 दिवस करा.

5.

खांदा किंवा मानेवरच्या नसा आणि स्नायूंवर ताण पडल्याने अनेकदा डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अशा प्रकारची डोकेदुखी सुरु झाल्यास मानेचे व खांद्याचे स्ट्रेचिंग करा.

6.

ॲसिडीटी किंवा गॅसमुळे जर डोके दुखत असलं तर एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

7.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की डिहायड्रेशन होते. त्यामुळेही डोके दुखू शकते. त्यामुळे अचानक डोके दुखू लागल्यास भरपूर पाणी प्या.

8.

डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोके दुखते. अशावेळी कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक द्या.

9.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही डोके दुखू शकते. अशावेळी भरपूर झाड असलेल्या ठिकाणी फेरफटका मारावा.

10.

सर्दीमुळे डोके दुखत असलं तर धनेपूड आणि साखर एकत्र करून खा. तसेच आलेयुक्त चहा घ्या.