​रात्री झोप येत नसेल तर करा हे उपाय​

1.

​रात्री झोप येत नसेल तर करा हे उपाय​

2.

​शारीरिक आणि मानसिकरित्या सुधृढ राहण्यासाठी चांगल्या झोपेची गरज असते. मात्र आजकाल अनेक जणांना निद्रानाश, व्यवस्थित झोप न लागणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.​

3.

​आरोग्य तज्ज्ञांच्या मते माणसाने कमीत कमी 7 तास झोप घ्यायला हवी. मात्र आजकाल कित्येक जण रात्री व्यवस्थित झोपू शकत नाही. किंवा झोपले तरी सकाळी लवकर झोप उघडते.​

4.

​जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर काही उपाय करू तुम्ही करून पाहू शकता. आज आपण काही उपायांबाबत जाणून घेणार आहोत.​

5.

​जर तुम्हाला झोप पूर्ण करायची असेल तर काहीही करून वेळेत झोपा. झोपायला उशीर केल्याने झोप पूर्ण होत नाही.​

6.

​जर तुम्हाला निद्रानाशचा आजार असेल तर झोपण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट दिनचर्या बनवावी लागेल. एका ठरवलेल्या वेळेत तुम्ही झोपायला सुरुवात केली तर झोप पूर्ण होईल.​

7.

​रात्री लवकर झोपायचे असल्यास सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठल्याने रात्री वेळेत तुम्हाला झोप येईल.​

8.

​चांगली झोप माणसाला चार्ज ठेवते. त्यामुळे झोपताना उशी, चादर आणि झोपण्याची पोझिशन यावरही लक्ष द्या.​

9.

​रात्री चांगली झोप येण्यासाठी रात्रीचे जेवणही योग्य असणे महत्वाचे आहे. रात्री जास्त जेवल्याने त्याचा प्रभाव तुमच्या झोपेवर होऊ शकतो.​

10.

​रात्री झोपताना मोबाईल किंवा इतर कोणतेही गॅजेट स्वतःपासून लांब ठेवा. तसेच झोपताना टीव्ही पाहणं टाळा. ​