वनस्पती-आधारित आहाराबद्दल वाचा ! जाणून घ्या त्याचे फायदे

1.

वनस्पती-आधारित आहाराबद्दल वाचा ! जाणून घ्या त्याचे फायदे

2.

फिटनेस एक्सपर्टमध्ये वनस्पती-आधारित आहाराची चर्चा आहे. पण, घासफूस म्हणजे वनस्पती-आधारित आहार नव्हे. ही संकल्पना थोडी वेगळी आहे.

3.

वनस्पती-आधारित आहारात फक्त वनस्पतींचाच समावेश असतो. हे शाकाहारी किंवा मांसाहारी आहारापेक्षा वेगळे आहे.

4.

वनस्पती आधारित या आहारपद्धतीत प्राणीजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे सांगितले जाते.

5.

या पद्धतीत वनस्पती, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, शेंगा, शेंगदाणे व बिया फक्त यावरच लक्ष केंद्रित केले जाते.

6.

फक्त वनस्पतींवरच अवलंबून असलेल्या या डाएट प्रकाराचे अनेक फायदे आहेत. तणाव कमी होणे, सांधेदुखी, कॅन्सर इत्यादी रोगांमध्ये या पद्धतीचा फायदा होतो.

7.

फायबरयुक्त आहार व प्रोसेस्ड फुड वगळल्याने वजन कमी होते. या डाएटमधील खाद्यपदार्थ चरबी आणि कोलेस्टेरॉल-मुक्त असतात.

8.

वनस्पतीयुक्त आहारामुळे आजारांवर नियंत्रण राहते. संतुलित आहार असल्याने उच्च रक्तदाब, हृद्यरोगांचा धोका कमी होतो.

9.

या आहारापद्धतीमुळे मूड चांगले राहते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

10.

वनस्पती, पालेभाज्या व फळांची उपलब्धता आपल्या भारतात जास्त असल्याने यावर जास्त खर्च होत नाही.